लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर अली असतानाच एमआयएम पक्षाचे चे चार नाराज नगरसेवक काँग्रेस पक्षाशी जवळीक साधून आहेत. लवकरच ते काँग्रेस मध्ये प्रवेश करनार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वंचित बहुजन आघाडी कडून एमआयएमचे औरंगाबाद मध्य चे आमदार इम्तियाज जलील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंतर्गत राजकारणामुळे पक्षातील चार नगरसेवक आ.जलील वर नाराज आहे. या चारही नागरसेवकांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी घेतल्या आहे.
मागील काही दिवसांपासून काँग्रेस प्रवेश च्या हालचाली या नागरसेवकांनी सुरू केल्या आहेत. काँग्रेस चे उमेदवार सुभाष झाबंड एमआयएम च्या नाराज नगरसेवकाना पक्षात घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे दिसते.हे नगरसेवक काँग्रेस मध्ये दाखल झाल्यास झाबंड यांना मोठी मदत होईल व याचे विपरीत परिणाम एमआयएम चे उमेदवार जलील यांच्या मातावर येऊ शकतो. नागरसेवकांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र त्यांची नाराजी दूर करेल असा कोणताही स्थनिक नेता एमआयएम कडे नसल्याने पक्षप्रमुख ओवैसी नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील की मग काँग्रेस या नाराजाना आपल्या तंबूत दाखल करून घेतली हे पाहणे येत्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे. तूर्तास तरी या चार नागरसेवकांनी त्याच्या वॉर्डामध्ये एमआयएम चा प्रचार थांबवून काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. एमआयएमचे कार्यकर्ते काँग्रेस चे काम करीत असल्याने जलील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे असे राजकीय वर्तुळात चर्चचिले जात आहे.